मागे कांही वर्षापुर्वी एकदा मी मुंबईला गेलो होतो.
तसा मुंबईशी फ़ार कमी वेळा माझा संबंध आला आहे.
मी सकाळी ९ च्या दरम्यान ठाणे रेल्वेस्टेशनवर उभा होतो आणि मला सिएसटी म्हणजेच छ. शिवाजीमहाराज टर्मिनसला जायचे होते.
सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंतची वेळ म्हणजे गर्दीची वेळ. ऑफ़िसला कामावर जाणारे वगैरे लोक फ़लाटावर फ़्रेश मुडमधे गाडीची वाट बघत उभे होते.
माणसानी प्रचंड संख्येने भरलेल्या रेल्वे फ़लाटावर येत होत्या.
सिएसटीला जायला इथून काही ओर्डिनरी स्लो लोकल ट्रेन असतात तर काही फ़ास्ट ट्रेनही येत असतात.
मुंबईत नवीन आलेल्या सगळ्याना देण्यात येणारा सल्ला मलाही दिला होताच तो म्हणजे "फ़ास्ट ट्रेनने जा म्हणजे लवकर पोहचशील". मलाही हा फ़ास्ट ट्रेनचा सल्ला लगेचच पटला.
स्टेशनवर पोहचलो तेव्हा एक लोकल स्लो ट्रेन तिथे हजरच होती पण पाठोपाठ फ़ास्ट ट्रेन येणार असल्याचे समजल्याने मी ती लोक ट्रेन सोडुन दिली.
बाहेरुन येत असल्याने फ़ास्ट ट्रेन आधीच खुप भरुन येत असतात. एक ट्रेन आली ती इतकी फ़ुल्ल होती की मी आत शिरु शकत नव्हतो. मीच काय मुंगीही आत प्रवेश करु शकली नसती. ट्रेन सोडुन देण्याशिवाय पर्याय नव्हता.
पाठोपाठ ऑर्डिनरी लोकल ट्रेन आली होती पण मी फ़ास्ट ट्रेनने जायला उत्सुक होतो त्यामूळे मी तिही सोडली.
अशा आणखी दोन ऑर्डिनरी स्लो लोकल ट्रेन सोडल्यावर चौकशी केली असता त्या नंतरची फ़ास्ट ट्रेन अर्धा तास उशीरा असल्याचे समजले.
मला आता काहितरी चुकत असल्याचे जाणवले होते.
मी मित्राला फ़ोन केला आणि विचारले तेव्हा कळले की मी फ़ास्ट ट्रेनने गेलो तर ४० मिनिटात पोहचतो तर लोकल ओर्डिनरी ट्रेनने गेलो तर एक तासात पोहचतो. मी डोक्याला हात लावला आणि विचार करु लागलो की मी या फ़ास्ट ट्रेनच्या नादात ३०-४० मिनिटे स्टेशनवर घालविली आहेत आणि एवढ्या वेळात ५ ओर्डनरी लोकल्स गेल्या आहेत त्यापैकी कोणत्याही ट्रेनने गेलो असतो तर आतापर्यन्त मी पोहचलो असतो. इतकेच नाही तर त्यात बसायला मोकळी जागा असल्याने मी निवांत सीटवर बसुन प्रवास केला असता. फास्ट ट्रेनच्या दरवाज्यात लोंबकळत उभे राहिल्याने ॲक्सिडेंट होवून बरेच लोक जीवाला मुकले आहेत. बेभरवशी फ़ास्ट ट्रेनपेक्षा समोर उभी असलेली लोकल ट्रेन पकडली असती तर बरे झाले असते.
असे सर्वाच्याच बाबतीत कधी ना कधी घडले असेल असा मनातल्या मनात विचार आला. तुमच्या बाबतीत असा अनुभव कधी आला आहे का?
फ़ास्ट ट्रेनने जा - हा सल्ला कोणालाही पटण्यासारखाच आहे पण तो प्रत्यक्षात अमलात आणताना असे अनुभव येत असतात.
इन्व्हेस्टमेन्टच्या बाबतीतही कांही लोक फ़ास्ट ट्रेननेच प्रवास करण्याचे ठरवतात. म्हणजेच त्याना पैसे गुंतवल्यापासून लगेचच त्यात वेगाने वाढ व्हायला लागेलेली हवी असते. कोणा मित्राने सांगितलेले असते की मी अमुक एक शेअर्समधे पैसे टाकले होते त्याचे दोन महिण्यात इतके इतके झाले. कोणी एका वर्षात १० लाखाचे १५ लाख केले अशी अनेक उदाहरणे त्याने डोळ्यासमोर ठेवलेली असतात. मग होते काय की आत्ता मार्केटचा ट्रेंड काय आहे? आणि कोणत्या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले पाहिजेत की ज्या शेअर्समधे जास्त वेगाने फ़ायदा होइल? हे लवकर ठरत नाही आणि ते नवख्या माणसांना कळणेही अवघड असते. शेअर बाजार थांबत नाही तो लोकल ट्रेनसारखा हळुहळु पुढेपुढे जात असतो. शेअर मार्केट्चा सेन्सेक्स वाढू लागला की की पैसे आता गुंतवू की सेन्सेक्स खाली येण्याची वाट पाहायची या संभ्रमात लोकल ट्रेनही निघून जाते. बझिंग स्टॉकच्या शोधात म्हणजे फ़ास्ट ट्रेनच्या नादात लोकल ट्रेन पोहचलेल्या असतात.
माझा सल्ला आहे की दरमाही थोडी थोडी रक्कम SIP द्वारे Mutual Fund मधे गुंतवल्यास कालांतराने खुप मोठी रक्कम आपल्याला मिळू शकते.
मित्रानो, सध्या बॅंक एफ़डीवर मिळणारे व्याज ७ ते ९% आहे आणि तेही हळूहळु कमी होत जात आहे. महागाई ७-८% दरवर्षी वाढते आहे म्हणजेच FD करणे तोट्याचे होईल. भारताच्या शेअर मार्केटने म्हणजे सेन्सेक्सने आतापर्यन्त खुप छान म्हणजे १६% पेक्षा जास्त वार्षिक रिटर्न्स दिले आहेत. पण त्यासाठी तुम्हाला स्वत:ला त्यात उडी मारण्याची गरज नाही. शेअर मार्केटचा फ़ायदाही आणि जास्त भरवशाच्या परताव्यासाठी म्युच्युअल फ़ंड बनलेले आहेत.
आयुष्यात मुलांची लग्ने असोत की शिक्षण असो घर खरेदी असो वा रिटायरमेंट प्लॅन अशी आर्थिक उद्दिष्टे साध्य करायची असतिल तर म्युच्युअल फ़ंडात गुंतवणुक करा. दरमाही SIP द्वारे जास्त कालावधीसाठी केलेल्या इन्व्हेस्टमेन्टवर आतापर्यंत १६% ते २२% पर्यंत वार्षिक रिटर्न्स मिळाले आहेत. ना बाजाराची दिशा बघायची गरज आहे ना स्टॉक सिलेक्षनची चिंता.
SIP सुरू करण्यासाठी आज आणि आत्ता हिच योग्य वेळ असते.
नेहमीच फ़ास्ट ट्रेनची वाट बघत बसू नका - उपलब्ध संधीचा फ़ायदा घ्या.
Friday, 18 March 2016
Wednesday, 9 March 2016
लकी व्हा !!
Definition of of Investment ?
गुंतवणूकीची व्याख्या खुप वेगवेगळ्या करता येतील.
एक व्याख्या अशीही करता येइल " Investment means Creating Chances to win "
" गुंतवणूक म्हणजे जिंकण्याच्या संधी निर्माण करणे होय"
एकदा एका सेमिनार मध्ये श्रीकृष्ण शर्मा यानी एक अनुभव शेअर केला होता.
" मी दिल्लीतल्या एका वर्दळीच्या ठिकाणी नेहमी जातो . तिथे इतके ट्रॅफिक आहे कि अर्ध्या तासाला जॅम लागतो. पार्किंगची सोय अपुरी पडते. बाकिचे लोक आपल्या कार दुरवर पार्किंग करुन तिथूनच रिक्षाने ऑफिसला पोहचत असत.
मला लोक विचारत, तुझी कार कोठे पार्क केलीस ?
मी सांगायचो की पार्किंगला याच बिल्डिंग खाली.
तेव्हा ते म्हणायचे की तू " लकी " आहेस बाबा म्हणून तुला पार्किंग मिळते.
खरेतर व्हायचे असे कि मी दररोज माझी कार तिथपर्यंत घेउन यायचो आणि १० तल्या ७ वेळा मला पार्किंग मिळायचेच आणि जेव्हा मिळत नव्हते तेव्हा मीही कार बाहेर नेउन पार्किंग करुन यायचो. पण १० तल्या ७ वेळा मी लकी ठरत असे कारण मी प्रत्त्येकवेळी प्रयत्न करायचो. बाकीचे स्वतःला अनलकी समजणारे लोक मात्र आधीच दूर कोठेतरी आपली कार पार्क करुन येत असत त्यामुळे ते कधीच लकी ठरु शकले नाहीत.
मला मात्र सर्वजण लकी म्हणत असत.
म्हणजेच लकी ठरण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी संधी आपणच निर्माण केली पाहिजे.
गुंतवणूकीच्या बाबतीतही आपण जिंकण्याची किंवा लकी ठरण्याची संधी निर्माण केली पाहिजे. योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्याशिवाय चांगले रिटर्न्स मिळण्याची संधी निर्माण होणार नाही. पार्किंग रिकामे आहे का नाही हे तिथपर्यंत गेल्याशिवाय कळणारच नाही. फक्त अभ्यास कामाचा नाही create your chances to win.
इथूनपुढे तुमचीही गाडी तिथपर्यंत येउद्या स्वतःला लकी बनवा.
Stay Invested !! Be Lucky !!!
Pradeep Powar

Subscribe to:
Comments (Atom)