Tuesday 11 July 2017

चक्रवाढ़ व्याजाची जादू

*चक्रवाढ व्याज म्हणजे जगातील आठवे आश्चर्य आहे*  -  अल्बर्ट आइन्स्टाइन

एक कथा आहे.
एकदा एक राजा बुद्धीबळ खेळणाऱ्या आपल्या एका नागरिकावर खूष झाला आणि त्यानं आपल्या मंत्र्यांना सांगितले की  *याला काय हवं ते विचारा आणि त्याची इच्छा पूर्ण करा*

तो नागरिक म्हणाला, *"मी सामान्य माणूस माझ्या गरजाही सामान्य आहेत. मला फक्त तांदूळ मोजून द्या. बुद्धीबळाच्या पहिल्या घरात फक्त एक तांदूळ, दुसऱ्या घरात त्याच्या दुप्पट म्हणजे दोन, तिसऱ्या त्याच्या दुप्पट म्हणजे ४ तांदूळ असे ६४ घरात मावतील एवढे तांदुळ मोजून द्या.*

राजा म्हणाला, *"या मूर्ख माणसाची इच्छा पूर्ण करा, याला राजाकडे काय मागावे तेही कळत नाही"*

त्यानंतर काही दिवस ते मंत्री राजवाड्यात दिसले नाहीत तेव्हा राजानं त्यांना कारण विचारलं.
मंत्री म्हणाले,
*"महाराज, माफी असावी कारण आम्ही तुमच्या आदेशानेच त्या हुशार माणसाच्या मागणीनुसार तांदळाची पूर्तता करत होतो, परंतु आपल्या राज्यातील सर्व ठिकाणाहून तांदूळ गोळा करूनही त्याच्या म्हणण्याएवढे तांदूळ उपलब्ध नाही.*
खरं आहे त्या गणितानुसार लागणारा एकूण तांदूळ आहे
*18,446,744,073,709,551,615*
Exactly amazing!!

Such is the power of compound interest.
आपण सगळे वाचतो - जाणतो पण कधी फील करत नाही की चक्रवाढ व्याजाची ताकत काय आहे.
चला आत्ताच एक प्रयोग करून बघा. एक वर्तमानपत्र घ्या आणि त्याच्या मधोमध कापून जोडायला सुरू करा. फक्त 42 वेळा ट्राय करा. बघा किती लांब जाऊ शकता?
*हीच तर ताकत आहे  चक्रवाढीची.*

आपलं मन सरळ विचार करन्यासाठी ट्रेनड आहे त्याला असा (चक्रम)विचार लवकर पटत नाही. 😃 परंतु हे प्रॅक्टिकली प्रुव्हड आहे.

चक्रवाढ व्याजाचा फंडा समजून घेणे हे फक्त बौद्धिक गणितासाठी नाही तर आपल्या जगण्याच्या लढाईत उपयोगाचं हत्यार आहे. आपण पैसे कमावण्याचे हजार मार्ग शोधत असताना असा आश्चर्यकारक फॉर्म्युला बाजूला ठेवणं तोट्याचे आहे.

जगप्रसिद्ध श्रीमंत वारेन बफेटचे उदाहरण वाचतो- सांगतो. पण त्यांचं उदाहरण हे चक्रवाढ वाढीचेच आहे. त्यांच्या संपत्तीत झालेली वाढ ही वरच्या बुद्धीबळाच्या गोष्टीसारखीच आहे.
वारेन बफेट यांच्याकडे ३० व्या वर्षी असणाऱ्या १ मिलीयन डॉलरचे ३९ व्या वर्षी २५ मिलियन झाले. ५३ व्या वर्षी ६२० मिलियन आणि ८३व्या वर्षी ५८ बिलियन डॉलर. 🚀
ही कमाल गुंतवणूकीच्या किमतीत झालेल्या चक्रवाढ वाढीचीच आहे.
Compound interest is a tail heavy process. You really start seeing the results only after a certain period of time.
*चक्रवाढ व्याजाची मजा काही वर्षांनंतरच येते ज्यांनी अनुभवली त्यांनी संपत्ती कमवली. ज्यांनी जितका वेळ दिला तितकं जास्त कमवले.*
The more you wait, the more you get. As simple as that.

And that’s the reason why Warren Buffet made most of his net worth after the age of 60.

*असं ऐकलंय की वर्तमानपत्र  मधोमध कट करून ४२वेळा जोडलं असता चंद्रापर्यंत लांब होऊ शकते. पण आणखी एकच स्टेप- आणखी एकदाच त्याला मधोमध कट करून जोडले असता तुम्ही पृथ्वीपासून चंद्र आणि चंद्रापासून पृध्वी असे दुप्पट अंतर पार करू शकता.*
हीच ताकत आहे कंपौंडिंग इंटरेस्टची.

प्रिय मित्रानो,
मी जेव्हा सांगतो की म्युच्युअल फंडात फक्त पाच हजार प्रती महिना गुंतवून लोकांनी कोटी दीड कोटी रुपये मिळवले तेव्हा तिथं हेच तर घडते.😊
किंवा 15 - 20 वर्षांपूर्वी ज्यांनी एक लाख रुपये म्युच्युअल फंडात गुंतवले होते त्यांचे आज 50 - 75 लाख रुपये झाले आहेत. हीच तर जादू आहे compounding interest ची. 😊😊
*Stay Invested, Stay Long*

Wish you all the best,

आपला,
प्रदीप पोवार
Mutual Funds & Health Insurance
🍎Apple Investment Services
📱9850098587