Sunday, 9 October 2016

Instant Gratification

Biggest Mistakes in Life

⏰Instant Gratification -
 "झटपट आनंद - तात्पुरत्या सुखासाठी भविष्यातील होणारा तोटा स्वीकारणे. "
एखाद्याला डॉक्टरांनी सांगितले असते कि अंडी मटण एकदम बंद- बाहेरचं खाणं बंद फक्त साधे जेवण वेळच्या वेळी खा. ते पटलेलं असते, परंतु कुठूनतरी मिसळपावचा किंवा चायनीजचा वास येतो किंवा मित्रांच पार्टिचे नियोजन सुरु होतं. मग काय डॉक्टरांनी सांगितलेल हळूच बाजूला पडते नी आपोआपच पार्टीला हजेरी लागते. मग काय कसली शुगर नी कसला बीपी ? फक्त 🍗🍖🍤🍟🌭🍕😃

दुसरे उदाहरण - उद्यापासून पहाटे लवकर उठून व्यायाम करण्याचं नियोजन असते पण सकाळी अंथरुणावरून उठावेसे वाटत नाही.
काही लोक तर म्हणतात कि "अलार्म बंद करून झोपाल्यावर रात्रीपेक्षापण चांगली झोप लागते "☺
असे करता करता व्यायामाचे राहूनच जाते.
हि दोन जशी perfect उदाहरणे आहेत तशीच आणखीन काही आहेत.

गरजेशिवायचा अतिरिक्त खर्च करणे - हे तुमच्याकडुन नकळत होते.
उदा. तुम्ही एक जाहीरात बघता 100 Megapixel चा कॅमेरा ज्यात 2000 पट optical zoom ची फ़ॅसिलिटी आहे. किमतीवर २०% सुट आणि ”मासिक सुलभ हप्त्यावर उपलब्ध” असे कळताच आपल्यातला फोटोग्राफ़र जागा होतो.
किंवा "५२ इंची LED TV वर १५% डिस्काउंट, सोबत होमथिएटर फ़्री" अशी जाहिरात बघताच आपल्याला जाणवू लागते कि आपली जूनी टिव्ही  बदलायची वेळ आली आहे. मग काय अशी खरेदी नकळतच होवुन जाते.

असे करताना बऱ्याचदा अशा वस्तूंची खरेदी खरंच गरजेची आहे का? हे आपण तपासत नाही. सर्व शेजारी, पाहुण्याकडे आहेत किंवा सगळे स्टाफ मेंबर घेत आहेत म्हणूनपन काही लोक खरेदी करतात. याबाबतीत मात्र "जगाबरोबर राहिलं पाहिजे" असे त्यांना वाटते 😏
नवीन मॉडेल आले कि लगेच TV किंवा मोबाईल बदलले जातात.
यात जाणाऱ्या पैशाचा विचार त्यांच्या मनाला शिवत नाही याचे कारण म्हणजे तात्पुरते समाधान -Instant Gratification😊

People
spend money,
to buy things,
to impress the people's,
People's- who they never like. 😛😜
यामुळे होतं काय की " गरज नसलेल्या वास्तूसाठी जेव्हा जास्त पैसा खर्च होतो तेव्हा गरजेच्या गोष्टीसाठी पैसा उरत नाही.

मित्रानो,
या दसरा आणि दिवाळीच्या सणात अशाप्रकारच्या तात्पुरत्या सुखाच्या जास्त नादी लागू नका. तुमचे आरोग्य, कुटुंब, धन-संपत्ती यांच्याबद्दलचे निर्णय घेताना आपण "INSTANT GRATIFICATION" च्या ट्रॅपमध्ये अडकलेले नाही ना याची खात्री करा.
फुल्ल प्लॅनिंग असणे हाच यातून वाचण्याचा मार्ग आहे.

विजयादशमी दसरा आणि दिवाळी या सणासुदीच्या दिवसांसाठी खूप खूप शुभेच्छा !! ✨✨

## प्रदीप पोवार
🍎Apple Investment Services
Mobile -9850098587

Friday, 1 July 2016

शेतकरी - The Great Investor

जगातील सर्वात मोठा Investor कोठे राहतो माहिती आहे ?
उत्तर आहे - भारतात

होय माझ्यामते दरवर्षी नियमितपणे सर्वात मोठी गुंतवणूक करणारा शेतकरी हाच सर्वात मोठा गुंतवणूकदार ठरेल. शेती करणं अडाणी माणसाचं काम नाही. सर्वात रिस्की बिझनेस म्हणजे शेती असे झाले आहे पण त्यातही रिस्क मॅनेजमेंट करून शेती पिकवून भारतीय शेतकरी हा GDP च्या 15 % हिस्सा पकडून आहे.

पिकाला कोणताही हमी भाव नसताना,
पावसाच्या लहरी वेळापत्रकावर विसंबून असताना,
पिकावर पडणारे विविध रोग,
खते औषधे यांची कृत्रिम टंचाई,
हे सगळं माहिती असूनही तो दरवर्षी नियमितपणे त्याच जिद्दीनं त्याच चिकाटीनं तितक्याच कष्टानं आपल्या रानाची मशागत करतो. ऊन पाऊस याची तमा नाही, काँग्रेस कि भाजप कोण सत्तेवर आहे याची गणती नाही तो कष्ट करतो आणि आशेनं आभाळाकडे पाहतो. ही त्याची गुंतवणूकच आहे. जी तो दरवर्षी नियमाने करतो. त्याला हेही माहीत आहे की पूर्वापार आपल्याकडं ३-४ वर्षांनी लहान दुष्काळ पडतो आणि १२-१३ वर्षांनी मोठा दुष्काळ पडतो. आणि हेही त्याला त्याच्या 'बा'नं सांगून ठेवल आहे की ' बाळा, पाऊस कितीही लहरी असला तरी चांगल्या पावसाची Probability जास्त आहे. फक्त तू नियमितपणे मशागतीची गुंतवणूक कर पाऊस येतो कि नाही याची चिंता करू नको.'
आणि तुम्हाला ठाऊक आहेच 100 तल्या 92 वेळा चांगला पाऊस झाला आहे आणि त्याची गुंतवणूक यशस्वी होते. होय हे खरं आहे कारण यामुळेच तर शेतकरी अजून टिकून आहे. आलेल्या धान्यातुन तो पुढच्या वर्षीसाठीसुद्धा थोडी तरतूद करून ठेवतो. जास्तीचं धान्य पाहुण्यांना देतो ज्यांची अडचणीच्यावेळी मदत मिळेल.
समजा जर त्याने फक्त लोकांच्याकडून हवामानाचे अंदाज ऐकले असते किंवा जर आता इंग्रज शासन गेले आता कष्ट न करता आपोआप शेती होईल असे ऐकले असते किंवा आता इंदिरा गांधी गेल्या आता शेती सोडून द्या असे ऐकले असते तर तो आतापर्यंत नामशेष झाला असता.
पण नाही, तो दरवर्षी नियमित मशागत करत राहिला आणि हेच त्याच्या यशाचं गमक आहे. हीच त्याची रिस्क मॅनेजमेन्ट सिस्टीम आहे.

आणि सर्वच Grate Investor च्या यशाचं गमक पण हेच आहे - "नियमित गुंतवणूक."

मित्रानो, तुम्ही कशी करता गुंतवणूक ?

योग्य आर्थिक सल्ला व गुंतवणूक मार्गदर्शनासाठी भेटा..

आपला,
प्रदीप पोवार
9850098587

Friday, 13 May 2016

अब्जाधीश बना!!!

अब्जाधीश बना!!!

या जगात प्रत्येक व्यक्तीचीच श्रीमंत बनण्याची इच्छा असते कोणी ती व्यक्त करतो तर कोणी असे बोलण्यासाठी कचरतो.
आज काल महागाई एवढी वाढलेली आहे कि करोडपती होऊनही तुम्ही तुमच्या साऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकत नाही हि वस्तुस्थिती आहे.  म्हणूनच आता आपण करोडपती नव्हे तर अब्जाधीश कसे बनू शकू याचा विचार केला पाहिजे.  परंतु होत काय कि जर आपण मध्यमवर्गीय असलो तर आपल्याला असे स्वप्न पाहण्याची सुद्धा भीती वाटते. हे मुळी अशक्यच आहे असच काहीस आपल्याला वाटत असत.  परंतु जरी तुम्ही माध्यम वर्गीय असलात तरी सुद्धा तुम्ही निश्चितच अब्जाधीश होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणू शकता. हे कसे शक्य आहे हेच या लेखात आपण पाहणार आहोत.

जरी तुम्ही मध्यमवर्गातील असलात परंतु जर तुमची खरोखर श्रीमंत होण्याची इच्छा असेल व त्यासाठी थोडी काटकसर व नियमित शहाणपणाने गुंतवणूक करण्याची तयारी असेल तर हे निश्चित साध्य होऊ शकते. एक लक्ष्यात घेतलेच पाहिजे कि आपल्या देशात जे काही अब्जाधीश लोक आहेत ती काही एका दिवसात श्रीमंत झालेली नाहीती.  त्यासाठी काही पिढ्या त्यांना कष्ट व नियमित व्यवसाय करावा लागलेला आहे. काही व्यक्ती दोन पिढ्यातच हे इप्सित साध्य करू शकलेली आहेत. फारच थोड्या व्यक्ती हे त्यांचे जीवनातच यात यशस्वी झालेली आहेत.  आपण सुद्धा जर असा विचार केला कि ठीक आहे मी शक्यतो याच जन्मात अब्जाधीश होण्याचा प्रयत्न करीन पण जर का ते नाही जमलं तर माझ कुटुंब पुढील पिढीत तरी अब्जाधीश झालेलं असेलच हा विचार आपल्याला केला पाहिजे.

म्युचुअल फंड हे सर्वसामान्य लोकांसाठी गुंतवणूकिचे एक सर्वोत्तम माध्यम आहे. यातील गुंतवणूक ही शेअर बाजारात केली जाते. आपल्यापैकी बरेच जणांचे असे गैर समज असतात कि शेअर बाजार म्हणजे जुगार, हा जणूकाही आपल्यासाठी नाहीच.  खर म्हणजे शेअर बाजार हाच संपत्ती निर्माण करण्यासाठी एक सर्वोत्तम गुंतवणुकीचा पर्याय आहे. परंतु शेअर बाजारात ट्रेडिंग अथवा गुंतवणूक करण्यासाठी त्याचे ज्ञान असणे आवश्यक असते मात्र ते सर्वांकडे असू शकत नाही व आपल्या नोकरी धंद्यातून तेवढा वेळ काढणेही सर्वांनाच शक्य होत हि नाही, हि वस्तुस्थिती आहे.  अशांसाठी तर म्युचुअल फंड आहे ना. कारण म्युचुअल फंड योजनांचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांचेकडे तज्ञ असा फंड मॅनेजर असतो ज्याला सहाय्य करण्यासाठी रिसर्च टीम असते जी शेअर बाजारातील घडामोडींचा बारकाईने अभ्यास करून आपला रिपोर्ट फंड मॅनेजरला देत असते त्याच्यावर विचार करून फंड मॅनेजर शेअर बाजारात कोणत्या कंपनीचे शेअर्स कधी व किती प्रमाणात व किती काळासाठी विकत घ्यावयाचे किंवा योजनेच्या पोर्टफोलिओ मध्ये असणारे कोणते शेअर्स सध्या विकावयाचे याचा निर्णय वेळोवेळी घेत असतो. काही कंपन्याच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आवश्यकता असल्यास टीम त्या कंपनीला भेट देऊन कंपनीची अधिक माहिती जमा करते. यासाठी कंपनीचे फंडामेंटल विश्लेषण केले जाते, भविष्यात त्या कंपनीला किती ऑर्डर्स मिळणार आहेत त्यातून किती नफा होऊ शकेल आदी सर्व गोष्टींचा विचार गुंतवणुकीचा निर्णय करण्यापूर्वी केला जातो. यामुळे भविष्यात त्या कंपनीच्या शेअर चा भाव किती प्रमाणात वाढू शकेल याचाही विचार केला जातो. या सर्व प्रकीरीयेनंतरच प्रत्यक्ष गुंतवणूक कंपनीच्या शेअर्स मध्ये योग्य त्या प्रमाणात केली जाते. याशिवाय एका कंपनीत किती प्रमाणात गुंतवणूक करावयाची यासाठी काही नियम असतात त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते. एखाद्या योजनेतील गुंतवणूक शेअर बाजारात किती प्रमाणात करावयाची किती प्रमाणात कर्जरोख्यात करावयाची याबाबत योजना जाहीर करण्यापूर्वीच ते जाहीर केले जाते व याचे पालन होते आहे कि नाही हे ए.एम.सी. व सेबी मार्फत वेळोवेळी तपासले जाते. कोणकोणत्या शेअर्स मध्ये व किती प्रमाणात गुंतवणूक करावयाची याचेही नियम ठरलेले असतात व त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते. या सर्वच गोष्टींमुळे शेअर बाजारातील गुंवानुकीची जोखीम म्युचुअल फंडात कमी होते. आपल्याला माहित असेलच जगात व आपल्या देशातही शेअर बाजाराला गेल्या २०० वर्षांपेक्षा जास्त काळाचा इतिहास आहे व असे दिसून आलेले आहे कि शेअर बाजारात दीर्घ मुद्तीत नेहमीच फायदा होतो.  असे सिद्ध झालेले आहे कि कोणत्याही ५० वर्षात शेअर बाजारातील गुंतवणुकीवर सरासरी १२०००% एवढा प्रचंड नफा जगात सर्वत्रच झालेला आहे. म्हणूनच जगातील महान गुंतवणूक गुरु वॉरेन बफेट असे सांगतो कि जेव्हा तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करता तेव्हा वर्षांचा नव्हे तर ४ ते ५ दश्कांचाच विचार केला पाहिजे.

हे सत्य आहे कि शेअर बाजारात नेहमीच चढ उतार होतच असतात व यामुळे जर अल्पकाळाचा विचार केला तर शेअर बाजारात नफा किंवा नुकसान जास्त प्रमणात होण्याची शक्यता असते मात्र जर आपले उदिष्ट २० किंवा अधिक वर्षांचे असेल तर नेहमीच शेअर बाजारातील गुंतवणुकीतून फायदाच होत असतो आणि म्हणूनच शेअर बाजारातील चढ उतार हि जोखीम न समजता एक उत्तम संधी म्हणूनच पाहिले पाहिजे. म्युचुअल फंडाच्या अनेक चांगल्या योजनेतून गेल्या वीस वर्षात सरासरी २०% ते २५% वार्षिक चक्रवाढ पद्धतीने गुंतवणुकीवर उत्पन्न मिळालेलं आहे.  आता हेच पहाना आपला सेन्सेक्स १९७९ साली सुरु झाला तेव्हा तो १०० होता आता तो ३०००० पर्यंत वर जाऊन सध्या २७००० चे आसपास आहे,म्हणजेच सरासरी वार्षिक १८% चक्रवाढ पद्धतीने उत्पन्न सेन्सेक्सने गेल्या ३६ वर्षात दिलेले आहे, व म्युचुअल फंडाने तर याहून जास्त दिलेले आहे कारण त्यांनी ते तसे दिले तरच त्या फंड मॅनेजरची हुशारी मानली जाते.

शेअर बाजारात म्युचुअल फंड योजनेतून गुंतवणूक करण्यासाठी फार मोठी रक्कमही लागत नाही. दर महा रु.१००० पासून कितीही रक्कम गुंतवता येते. ज्यांनी गेले २० वर्षे नियमित दर महा रु.१००० काही चांगल्या योजनेत एस.आय.पी. माध्यमातून गुंतवलेले आहेत त्यांचे आजपर्यंत रु.२.४० लाख रक्कम गुंत्वावून झाली व आज त्याचे मूल्य रु.४५ लाख ते ५० लाख एवढे झालेले आहे.

आता असा विचार केला पाहिजे कि म्युचुअल फंडात दीर्घकाळ व नियमितपणे दरमहिना गुंतवणूक करण्याची माझी तयारी असेल तर मला भविष्यात सरासरी किती उत्पन्न वार्षिक चक्रवाढ पद्धतीने मिळू शकेल व यासाठी काही गणितीय सूत्र आहे काय?  होय असे ढोबळमानाने सांगता येते कि देशाचा जो जी.डी.पी. (ठोकळ उत्पनाचा दर) असतो त्यात जर आपण वार्षिक महागाईचा दर मिळवला तर जेवढी संख्या येईल तेवढे किमान उत्पन्न गुंतवणूकदाराला म्युचुअल फंडातून मिळाले पाहिजे. जेव्हा आर्थिक प्रगती कमी असते तेव्हा जी.डी.पी. कमी असतो व महागाईचा दर जास्त असतो व जेव्हा देशाचा आर्थिक विकासाचा दर वाढू लागतो तेव्हा महागाईचा दर कमी होतो. सध्या आपल्या देशात जी.डी.पी. चा दर सरासरी ७.३% आहे व महागाईचा दर आहे ७% म्हणजेच तुम्हाला म्युचुअल फंडाच्या डायव्हरसिफाइड इक्वीटी योजनेतून वार्षिक किमान १४.५% पेक्षा जास्त किंवा १५% पेक्षा जास्त उत्पन्न वार्षिक चक्रवाढ पद्धतीने मिळू शकेल. बहुतांशी हे तुम्हाला जास्तच मिळणार आहे पण १५% हे सुद्धा काही कमी नाही कारण बँकेत तुम्हाला ८% ते ९% एवढेच व्याज मिळत असते, त्यातूनही महागाई व कर वजा केला तर निव्वळ आपले पैसे सुरक्षीत ठेवण्यासाठीच आपण बँकेत पैसे ठेवत असतो.

आता जर तुम्हाला अब्जाधीश  बनवायचे असेल तर दर महिना किती रक्कम गुंतवली पाहिजे व ती किती काळासाठी गुंतवली पाहिजे हे पाहूया. आता जर कर का तुम्ही दर महा फक्त रु.१००० गुंतवणार असाल व मिळणारा चक्रवाढ व्याजाचा वार्षिक दर १५% गृहीत धरला तर तुम्हाला ६७ वर्षे नियमित दर महा गुंतवणूक केली पाहिजे तर कोठे जाऊन तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य रु.१०० कोटी म्हणजेच एक अब्ज एवढे होईल. पण हेच जर का तुम्ही दर महा रु.१०,००० ची गुंतवणूक केली तर ५० ते ५१ वर्षात तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य रु.१०० कोटी (एक अब्ज) होईल.

आता हा काळ कमी करण्यासाठी काय केले पाहिजे?

 सुमारे ५० वर्षापूर्वी एखादी व्यक्ती जेव्हा नवीन नोकरीला लागाव्याची तेव्हा त्याचा सुरुवातीचा पगार असायचा सुमारे रु.१२५/- दर महा, तेच जर आज पाहिले तर सुरुवातीचा पगार असतो साधारण रु.२५००० महिना. याचे कारण दर वर्षीच महागाई वाढत असते व त्यामुळे चलनाची किंमत कमी होते तर त्यामुळे दर वर्षीच पगार किंवा आपले उत्पन्न सरासरी १०% ते २०% वाढत असते आणि म्हणूनच गुंतवणूक करतानासुद्धा आपण दर वर्षी आपल्या गुंतवणुकीत वाढ केलीच पाहिजे, ती किती करावी तर किमान दर वर्षी १०% दराने केली पाहिजी. आता असे केले तर काय होईल ते पहा.  जर का वरील उदाहरणात  दर महा रु.१०,००० वार्षिक १०% वाढ करीत गुंतवले तर ४५ वर्षात रु.१०० कोटी होतील.

मागील २५ वर्षात म्युचुअल फंडाच्या डायव्हरसिफाइड इक्वीटी योजनेत एस.आय.पी. माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक चक्रवाढ पद्धतीने मिळालेला परतावा सरासरी २३% एवढा आहे. हे लक्षात घेतले तर हा काळ कमी होवू शकतो.

जर का तुम्ही आज ३० वर्षाचे असाल तर तुमच्या मनात असे येऊ शकते कि, मी सतत काटकसर करून नियमितपणे गुंतवणूक करत रहावयाचे व अजून ४० वर्षांनी जर का मी अब्जोपती होणार असेन तर त्याचा मला काय फायदा कारण तेव्हा मी असेन ७० वर्षांचा, पण एक लक्षात घ्या हाच विचार जर ज्या आपल्या पूर्वजांनी केला असता तर त्यांनी कधीच माणगावी नारळाचे झाड कधीच लावले नसते कारण ते फळधारणा करण्यासाठी ३५ वर्षे घेते, पण त्यांनी हा विचार न करता कृती केल्यामुळेच आपण आज अशी अनेक फळ खात आहोत.  तुम्ही जर असे केलेत तर तुमच्या म्हातारपणी तरी तुमची कदाचित सारी स्वप्न पूर्ण होऊ शकतील, किंवा तुमची पुढील पिढी तरी आर्थिक चिंतामुक्त जीवन जगू शकेल. कारण प्रत्येकाचीच एक इच्छा असते कि आपल एक चांगल घर असावे, गाडी असावी व आर्थिक चिंता मुक्त जीवन असावे हे तुमच्या बाबत किंवा तुमच्या पुढच्या पिढीला तरी भाग्य लाभेल.

खरे आहे ना ?

Friday, 18 March 2016

फास्ट ट्रेन

मागे कांही वर्षापुर्वी एकदा मी मुंबईला गेलो होतो.
तसा मुंबईशी फ़ार कमी वेळा माझा संबंध आला आहे.

मी सकाळी ९ च्या दरम्यान ठाणे रेल्वेस्टेशनवर उभा होतो आणि मला सिएसटी म्हणजेच छ. शिवाजीमहाराज टर्मिनसला जायचे होते.

सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंतची वेळ म्हणजे गर्दीची वेळ. ऑफ़िसला कामावर जाणारे वगैरे लोक फ़लाटावर फ़्रेश मुडमधे गाडीची वाट बघत उभे होते.

माणसानी प्रचंड संख्येने भरलेल्या रेल्वे फ़लाटावर येत होत्या.

सिएसटीला जायला इथून काही ओर्डिनरी स्लो लोकल ट्रेन असतात तर काही फ़ास्ट ट्रेनही येत असतात.

मुंबईत नवीन आलेल्या सगळ्याना देण्यात येणारा सल्ला मलाही दिला होताच तो म्हणजे "फ़ास्ट ट्रेनने जा म्हणजे लवकर पोहचशील". मलाही हा फ़ास्ट ट्रेनचा सल्ला लगेचच पटला.

स्टेशनवर पोहचलो तेव्हा एक लोकल स्लो ट्रेन तिथे हजरच होती पण पाठोपाठ फ़ास्ट ट्रेन येणार असल्याचे समजल्याने मी ती लोक ट्रेन सोडुन दिली.

बाहेरुन येत असल्याने फ़ास्ट ट्रेन आधीच खुप भरुन येत असतात. एक ट्रेन आली ती इतकी फ़ुल्ल होती की मी आत शिरु शकत नव्हतो. मीच काय मुंगीही आत प्रवेश करु शकली नसती. ट्रेन सोडुन देण्याशिवाय पर्याय नव्हता.
पाठोपाठ ऑर्डिनरी लोकल ट्रेन आली होती पण मी फ़ास्ट ट्रेनने जायला उत्सुक होतो त्यामूळे मी तिही सोडली.

अशा आणखी दोन ऑर्डिनरी स्लो लोकल ट्रेन सोडल्यावर चौकशी केली असता त्या नंतरची फ़ास्ट ट्रेन अर्धा तास उशीरा असल्याचे समजले.
मला आता काहितरी चुकत असल्याचे जाणवले होते.

मी मित्राला फ़ोन केला आणि विचारले तेव्हा कळले की मी फ़ास्ट ट्रेनने गेलो तर ४० मिनिटात पोहचतो तर लोकल ओर्डिनरी ट्रेनने गेलो तर एक तासात पोहचतो. मी डोक्याला हात लावला आणि विचार करु लागलो की मी या फ़ास्ट ट्रेनच्या नादात ३०-४० मिनिटे स्टेशनवर घालविली आहेत आणि एवढ्या वेळात ५ ओर्डनरी लोकल्स गेल्या आहेत त्यापैकी कोणत्याही ट्रेनने गेलो असतो तर आतापर्यन्त मी पोहचलो असतो. इतकेच नाही तर त्यात बसायला मोकळी जागा असल्याने मी निवांत सीटवर बसुन प्रवास केला असता. फास्ट ट्रेनच्या दरवाज्यात लोंबकळत उभे राहिल्याने ॲक्सिडेंट होवून बरेच लोक जीवाला मुकले आहेत.  बेभरवशी फ़ास्ट ट्रेनपेक्षा समोर उभी असलेली लोकल ट्रेन पकडली असती तर बरे झाले असते.

असे सर्वाच्याच बाबतीत कधी ना कधी घडले असेल असा मनातल्या मनात विचार आला. तुमच्या बाबतीत असा अनुभव कधी आला आहे का?

फ़ास्ट ट्रेनने जा - हा सल्ला कोणालाही पटण्यासारखाच आहे पण तो प्रत्यक्षात अमलात आणताना असे अनुभव येत असतात.

इन्व्हेस्टमेन्टच्या बाबतीतही कांही लोक फ़ास्ट ट्रेननेच प्रवास करण्याचे ठरवतात. म्हणजेच त्याना पैसे गुंतवल्यापासून लगेचच त्यात वेगाने वाढ व्हायला लागेलेली हवी असते. कोणा मित्राने सांगितलेले असते की मी अमुक एक शेअर्समधे पैसे टाकले होते त्याचे दोन महिण्यात इतके इतके झाले. कोणी एका वर्षात १० लाखाचे १५ लाख केले अशी अनेक उदाहरणे त्याने डोळ्यासमोर ठेवलेली असतात. मग होते काय की आत्ता मार्केटचा ट्रेंड काय आहे? आणि कोणत्या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले पाहिजेत की ज्या शेअर्समधे जास्त वेगाने फ़ायदा होइल? हे लवकर ठरत नाही आणि ते नवख्या माणसांना कळणेही अवघड असते. शेअर बाजार थांबत नाही तो लोकल ट्रेनसारखा हळुहळु पुढेपुढे जात असतो. शेअर मार्केट्चा सेन्सेक्स वाढू लागला की की पैसे आता गुंतवू की सेन्सेक्स खाली येण्याची वाट पाहायची या संभ्रमात लोकल ट्रेनही निघून जाते. बझिंग स्टॉकच्या शोधात म्हणजे फ़ास्ट ट्रेनच्या नादात लोकल ट्रेन पोहचलेल्या असतात.

माझा सल्ला आहे की दरमाही थोडी थोडी रक्कम SIP द्वारे Mutual Fund मधे गुंतवल्यास कालांतराने खुप मोठी रक्कम आपल्याला मिळू शकते.

मित्रानो, सध्या बॅंक एफ़डीवर मिळणारे व्याज ७ ते ९% आहे आणि तेही हळूहळु कमी होत जात आहे. महागाई ७-८% दरवर्षी वाढते आहे म्हणजेच FD करणे तोट्याचे होईल. भारताच्या शेअर मार्केटने म्हणजे सेन्सेक्सने आतापर्यन्त खुप छान म्हणजे १६% पेक्षा जास्त वार्षिक रिटर्न्स दिले आहेत. पण त्यासाठी तुम्हाला स्वत:ला त्यात उडी मारण्याची गरज नाही. शेअर मार्केटचा फ़ायदाही आणि जास्त भरवशाच्या परताव्यासाठी म्युच्युअल फ़ंड बनलेले आहेत.

आयुष्यात मुलांची लग्ने असोत की शिक्षण असो घर खरेदी असो वा रिटायरमेंट प्लॅन अशी आर्थिक उद्दिष्टे साध्य करायची असतिल तर म्युच्युअल फ़ंडात गुंतवणुक करा. दरमाही SIP द्वारे जास्त कालावधीसाठी केलेल्या इन्व्हेस्टमेन्टवर आतापर्यंत १६% ते २२% पर्यंत वार्षिक रिटर्न्स मिळाले आहेत. ना बाजाराची दिशा बघायची गरज आहे ना स्टॉक सिलेक्षनची चिंता.
SIP सुरू करण्यासाठी आज आणि आत्ता हिच योग्य वेळ असते.

नेहमीच फ़ास्ट ट्रेनची वाट बघत बसू नका - उपलब्ध संधीचा फ़ायदा घ्या.

Wednesday, 9 March 2016

लकी व्हा !!

Definition of of Investment ?

गुंतवणूकीची व्याख्या खुप वेगवेगळ्या करता येतील.
एक व्याख्या अशीही करता येइल " Investment means Creating Chances to win "

" गुंतवणूक म्हणजे जिंकण्याच्या संधी निर्माण करणे होय"

एकदा एका सेमिनार मध्ये श्रीकृष्ण शर्मा यानी एक अनुभव शेअर केला होता.
" मी दिल्लीतल्या एका वर्दळीच्या ठिकाणी नेहमी जातो . तिथे इतके ट्रॅफिक आहे कि अर्ध्या तासाला जॅम लागतो.  पार्किंगची सोय अपुरी पडते. बाकिचे लोक आपल्या कार दुरवर पार्किंग करुन तिथूनच रिक्षाने ऑफिसला पोहचत असत.
मला लोक विचारत, तुझी कार कोठे पार्क केलीस ?
मी सांगायचो की पार्किंगला याच बिल्डिंग खाली.
तेव्हा ते म्हणायचे की तू " लकी " आहेस बाबा म्हणून तुला पार्किंग मिळते.
खरेतर व्हायचे असे कि मी दररोज माझी कार तिथपर्यंत घेउन यायचो आणि १० तल्या ७ वेळा मला पार्किंग मिळायचेच आणि जेव्हा मिळत नव्हते तेव्हा मीही कार बाहेर नेउन पार्किंग करुन यायचो. पण १० तल्या ७ वेळा मी लकी ठरत असे कारण मी प्रत्त्येकवेळी प्रयत्न करायचो. बाकीचे स्वतःला अनलकी समजणारे लोक मात्र आधीच दूर कोठेतरी आपली कार पार्क करुन येत असत त्यामुळे ते कधीच लकी ठरु शकले नाहीत.
मला मात्र सर्वजण लकी म्हणत असत.

म्हणजेच लकी ठरण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी संधी आपणच निर्माण केली पाहिजे.

गुंतवणूकीच्या बाबतीतही आपण जिंकण्याची किंवा लकी ठरण्याची संधी निर्माण केली पाहिजे. योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्याशिवाय चांगले रिटर्न्स मिळण्याची संधी निर्माण होणार नाही. पार्किंग रिकामे आहे का नाही हे तिथपर्यंत गेल्याशिवाय कळणारच नाही. फक्त अभ्यास कामाचा नाही create your chances to win.
इथूनपुढे तुमचीही गाडी तिथपर्यंत येउद्या स्वतःला लकी बनवा.
Stay Invested !! Be Lucky !!!

Pradeep Powar

Saturday, 9 January 2016

रिटायरमेंट प्लॅनिंग

प्रिय मित्रांनो,
काही दिवसापुर्वी ऑस्ट्रेलियाच्या एका क्रिकेटपट्टूने आपली निव्रुत्ती जाहीर केली. मागच्या काही महिन्यातही आणखी एकाने रिटायरमेंट घेतली होती. ऐन पस्तीशीतल्या दोघांनीही यापुढे आपला पूर्णवेळ कुटुंबियाना देणार असल्याचे सांगितले. क्रिकेटमूळे सर्ववेळ ग्राउंडवर आणि प्रवासात जात असल्यामूळे मुलांच्या संगोपनात स्वत:चा वाटा ते निभाउ शकत नव्हते असे ते म्हणतात. आणि खरोखर ते तिशी-पस्तीशीत कामापासुन रिटायर होवू शकतात.

आपल्याकडेही आजकाल हाच ट्रेंड ऐकायला येतो की "मला लवकरच रिटायर व्हायचे आहे. आत्ता जास्त कष्ट करावे लागले तरी चालतील पण स्वत:च्या कुटुंबासोबत रिटायरमेंट लाईफ एंजोय करता आली पाहिजे "

याबरोबरच काहीवेळा रिटायरमेंट प्लॅन मधे गुंतवणूकसंबधी जाहिरातबाजीही ऐकायला मिळते की आजच आमच्याकडे गुंतवणूक करा आणि रिटायरमेंट एंजोय करा. परदेशात ट्रिपला जा. अमुकतमुक पेन्शन प्लॅनमध्ये पैसे गुंतवा नाहीतर म्हातारपणी दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागेल. वगैरे वगैरे.

यातल्या काही गोष्टी खऱ्याही आहेत. ऑस्ट्रेलियाचे फक्त क्रिकेटपटूच नाही तर बहुतांश लोक कामापासुन लवकर रिटायर होवू शकतात याचे मुख्य कारण त्यांची रिटायरमेंट फंडातील गुंतवणूक होय. एका आकडेवारी नुसार ऑस्ट्रेलियाची रिटायरमेंट फंडातील गुंतवणूक हि ऑस्ट्रेलियाच्या GDP च्या १४६% आहे तर आपल्याकडे सगळीमिळून फक्त १३% पर्यंत आहे. आपल्याकडे रिटायरमेंट किंवा पेंशन फंडाकडे लोक दुर्लक्ष करतात यामागे बरीच कारणे आहेत. पहिले आणि मुख्य कारण म्हणजे त्याच्या गरजेविषयीची जागरुता. दुसरे कारण सर्वाना पटण्याजोगे आहे ते म्हणजे आपण सर्वजण ती जबाबदारी म्हातारपणी आपल्या मुलांवर सोपवत होतो आणि आपला सर्व पैसा, वेळ, प्रेम सर्वकाही मुलामध्ये गुंतवत होतो. मुलांचे शिक्षण, लग्न, घर-संसार उभा करतो. पण " हम दो हमारा एक " च्या काळात आपला मुलगा आपल्याला योग्य सन्मानाने सांभाळेल यांची गॅरंटी काय? दिवसेंदिवस वाढती महागाई, आर्थिक नियोजनाचा अभाव आणि इतर चैनीच्या वस्तूवर होणारा खर्च यातून तुमच्या मुलांचीही वाट "बिकट वाट वहिवाट " असे होणार आहे.

आणखी एक कारण म्हणजे Priorities आपल्याकडे लोक प्रथम प्रिओरिटी ही घराला देतात त्यामुळे पिढी दर पिढी प्रत्तेकाच्या कमाईचा मोठा हिस्सा हा नवीन घर बांधणे किंवा विकत घेणे यावर खर्च होतो. अनेकदा तर आयुष्यात फ़क्त घर हि एकमेवच गोष्ट उभी करता करता म्हातारे होतो. त्यानंतर नंबर लागतो तो सोन्याचा. लग्ने असोत वा बारसे भरमसाठ सोने खरेदी ठरलेलीच. त्यानंतरही दर वर्षी कांही ना कांही रक्कम हि सोने खरेदीवर खर्च होतेच.

अशा अनेक कारणानी स्वत:च्या रिटायरमेंट नंतरच्या आयुष्याबाबत कधी विचारच होत नाही. त्यातच वाढत्या आरोग्य सुविधामुळे सरासरी वयोमानही वाढले आहे त्यामुळे म्हाताऱ्या लोकांचा चरितार्थाचा खर्च वाढता राहणार आहें.

अशा परिस्थितीत जर आपली रिटायरमेंट लाईफ़ मुलांच्यावर बोजा न बनता खरोखरच एन्जॉय करायची असेल, परदेशवारी, गोवा बीचवर जाउन धुम करायची असेल, आपल्या नातवांना वाढदिवसाच्या किमती गिफ़्ट द्यायच्या असतील तर हाती हक्काचा पैसा हवाच. त्यामुळे पेंशन प्लॅन हि काळाची गरज आहे.

आज आपल्यापैकी कितीजनानी यासंदर्भात विचार केला आहे ? आपल्या स्वत:चे टार्गेट सेट केले आहे का? आपल्याकडे ज्या उपलब्ध स्किम आणि रिटायरमेंट प्लॅन आहेत ते आपल्यासाठी योग्य आहेत का? जाहीराती फ़क्त भुलवणा-या तर नाहीत ना?

आपल्या सर्वासाठी मीच जरा एक कॅल्क्युलेशन मांडतो बघा पटतय का ?

आज एका सर्वसाधारण कुटुंबाचा एक महिण्याचा घरखर्च रु. ८,५००/- आहे. (यात अगदी कपडे खरेदी, सण समारंभ इ गोष्टी धरल्या नाहीत)

गेल्या ३५ वर्षाचा महागाई वाढीचा दर सरासरी ७.५० % होता. समजा इथुनपुढे महागाई दरवर्षी ७% ने वाढत असेल तर २० वर्षानंतर एका महिण्याचा खर्च असेल रु ३२,०००/-, २५ वर्षानी ४५,०००/- आणि ३० वर्षानंतर रु. ६३,५००/- प्रती महिना

पण हेच जर महागाई ९% ने वाढली तर ३० वर्षानी एका महिण्याचा फक्त घरखर्च असेल रु. १,१०, ५००/- ???? एक लाख दहा हजार पाचशे रुपये फक्त ??

शॉक बसला ??

आजचा मासिक खर्च
,५००/-
,५००/-
,५००/-
वार्षिक महागाई वाढ
%
%
%
२० वर्षानंतरचा मासिक खर्च
३२,०००/-
३८,८४१/-
४६,७००/-
२५ वर्षानंतरचा मासिक खर्च
४५,०००/-
५५,७३७/-
७१,८५०/-
३० वर्षानंतरचा मासिक खर्च
६३,५००/-
८३,८५५/-
,१०,५६४/-

आता हे पाहू कि एकाद्याला निदान घरखर्चाचे टेंशन सोडून सन्मानाने जगण्यासाठी नेमके किती रुपये लागतील ?

समजा आज एखाद्या वय वर्ष ३५ असणाऱ्या माणसाला ६० व्या वर्षी रिटायर व्हायचे आहे आणि तो पुढे ८० वर्षापर्यंत जगला तर त्याला रिटायरमेंटसाठी ७% महागाई दराने साधारणपणे १ कोटी रुपये लागतिल. तेच ८% महागाई दराने १ कोटी ३५ लाख रु आणि ९% महागाईने १ कोटी ७६ लाख रुपये लागतील. हे झाले एकुण लागणा-या रिटायरमेंट फंडाचे आकडे. जर कोणाला पेंशन किंवा रिटायरमेंट फंडात पैसे गुंतवायचे असल्यास काय कराल ? म्हणजेच जर २५ वर्षात १ कोटी रु जमवायचे तर कोठे गुंतवावेत ?


वार्षिक परतावा % रु १ कोटीसाठी कोटी ३५ लाख १ कोटी ७५ लाखसाठी
मासिक रिकरिंग ठेव
मुदत २५ वर्षे
मुदत २५ वर्षे
मुदत २५ वर्षे
% ने मासिक रिकरिंग
,०००/-
१२,०००/-
१५,६००/-
१२ % ने मासिक रिकरिंग
,३००/-
,२००/-
,३००/-
१५ % ने मासिक रिकरिंग
,०००/-
,२००/-
,४००/-

याचाच अर्थ २५ वर्षात १ कोटी रुपये जमा व्हायचे असतिल तर ९% ने रिटर्न्स असणार्या ठिकाणी ९ हजार रु ची मासिक रिकरिंग करावी लागेल. पण तेच १५ % वार्षिक रिटर्न्स असणाऱ्या ठिकाणी फक्त ३ हजारची मासिक रिकरिंग केली तरीही १ कोटी रु जमू शकतात. एकरक्कमी गुंतवायचे असल्यास ९% ने रिटर्न्स असणार्या ठिकाणी २५ वर्षासाठी रुपये ११ लाख ५० हजार तर १५ % वार्षिक रिटर्न्स असणाऱ्या ठिकाणी फक्त 3 लाख रुपये गुंतवावे लागतील.

मित्रानो, जाहिरातीना भुलू नका. आपले रिटायरमेंट प्लॅनिंग योग्य प्रकारे करा. आधी आपले टार्गेट सेट करा आणि तिथपर्यन्त पोहचवू शकणारेच वाहन निवडा.

Saturday, 2 January 2016

Common Mistakes in Personal Finance

Common Mistakes in Personal Finance
प्रिय मित्रांनो,
खालीलपैकी एक तरी चूक कधी ना कधी, कळत न कळत आपल्याकडून होत असते
१) गरजेशिवायचा अतिरिक्त खर्च करणे
हे तुमच्याकडुन नकळत होते. उदा. तुम्ही एक जाहीरात बघता 100 Megapixel चा कॅमेरा ज्यात 2000 पट optical zoom ची फ़ॅसिलिटी आहे. किमतीवर २०% सुट आणि ”मासिक सुलभ हप्त्यावर उपलब्ध” असे कळताच आपल्यातला फोटोग्राफ़र जागा होतो. किंवा ५२ इंची LED TV वर १५% डिस्काउंट, सोबत होमथिएटर फ़्री अशी जाहिरात बघताच आपल्याला जाणवू लागते कि आपली जूनी टिव्ही आता ब्लर दिसते आहे आणि तिला बदलायची वेळ आली आहे. मग काय अशी खरेदी नकळतच होवुन जाते.
(प्लिज इथे Financial Planning म्हणजे काहिंच खर्च न करणे असा घेउ नका. आपल्या स्वप्नांना आणि गरजाना योग्य न्याय देणे Financial Planning चाच एक भाग असते)

२) पत्नी आणि मुलासोबत आर्थिक नियोजनाबद्दल चर्चा न करणे
कुटुंबातील जवळपास सर्वाना कमवणा-याची कमाई माहीत असते पण खर्चाचा रकाणा कोण बघत नाही. विमा, होमलोनचे हप्ते, मुलांचे शिक्षण, लग्ने, रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी आपण काय करता ते सर्वाना माहीत असावे. तेव्हा सर्वाना भविष्याच्या नियोजनात सामिल करुन घ्या.

३) गुंतवणुकीबाबत असमतोल असणे
कोणातरी एजंटच्या सांगण्यावरुन एखाद्या फ़ॉर्मवर सही केली की कांही लोकांचे टॅक्स प्लॅनिंग संपते. . . मग कालांतराने अशा लोकांच्या बॅंक खात्यात लाखो रुपये पडुन असतात. एफ़डीची मुदत संपली की नवीन करणे म्हणजेच आर्थिक नियोजन असे होवून बसते. शेवटी शेवटी कळते की शेअर मार्केटमधे फ़ायदा आहे. बघुया काय होते? असे म्हणुन १०-१५ हजार रु गुंतवायचे आणि १ वर्षात डब्बल व्हायची वाट बघायची. . .

याच्या विरुध्द कांही लोक ना बॅंकेत एफ़डी करतात ना पीपीएफ़ ते स्वत: शेअर ट्रेडींग करतात कधी यांची रक्कम १० वरुन १५ लाख होते तर कधी १५ वरुन ८ लाख, पुन्हा ८ वरुन १२ होते. असे करता करता कालांतराने तिथेच असतात.

गुंतवणुकीचा हिस्सा योग्य प्रमाणात ज्या ठिकाणी असायला हवा तिथे नसल्यामूळे दोघांचेही आर्थिक नियोजन फ़सते. योग्य सल्लागार निवडण्याचे टाळले की "चान्स" निघुन जातो.

४) जवळच्या लोकांकडुन येणा-या गोष्टी स्विकारणे
जर एखाद्या नकली वस्तू विक्रीवर तुम्हाला जर ३५ % कमीशन मिळत असेल तर अशा वस्तूसाठी तुम्ही स्वत:चा कष्टाचा पैसा खर्च कराल का? नक्कीच नाही
पण जर तीच वस्तू तुमच्या सोबतच्या लोकाना, मित्राना, मेव्हन्याला, मेव्हनीला, मामाला, मामाच्या मुलाला विकायची असेल तर ? तुम्हाला ३५% कमीशन आहे भाऊ !!


हेच तर घडतय. हे अशा प्रकारचे बेस्ट प्लॅन तुमच्याच जवळच्या लोकांकडुन येतात आणि तुमच्या कष्टाच्या पैशासह जीवनभरच्या सुखाला पारखे होता. तेव्हा सरळ म्हणा " नको ". कारण आजचा नको हा आयुष्यासाठी फ़ायद्याचा ठरु शकतो. जरी तुमच्या नात्याला थोडी ठेच लागली तरीही तुमच्या गळ्यात नकली प्रॉडक्टचा फ़ास पडण्यापासुन वाचाल.
मला खुप लोक भेटुन सांगतात की कसे नात्यातल्या लोकांनी नको नको म्हणतानासुध्दा विमा पॉलिसी गळ्यात घातली. कांही लोकांच्या वडीलांनीच सुरु केलीली विमापॉलिसी वारश्याने पुढे २०-२५ वर्षे चालवण्याचे काम त्यांच्यावर येउन पडले आहे.

५) गुंतवणुकीमधुन अवास्तव परताव्याची अपेक्षा करणे

अमेरिकेत बॅकेच्या FD (फ़िक्सड डिपॉझिट) वर १-२ % व्याज मिळते तर आपल्याकडे ८ - ९ %. त्या तुलणेत शेअर मार्केटमधुन १२-१५% रिटर्नस आल्यास चांगलेच म्हटले पाहिजे पण कांही लोक असे भेटले की अमूक एका मित्राने एका वर्षात १० लाखाचे २० लाख केले आणखी एकाने २ लाखाचे ३ लाख केले मग तुमचा सल्ला द्या - मी कोणता शेअर्स घेउ ? आता बोला !!!

मुलांचे शिक्षण आणि रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी १०-२० वर्षासाठी म्युच्युअल फ़ंडात SIP करणे पुरेशी आहे. ५०% आणि १००% परताव्यासाठी दरवर्षी झगडण्याची गरज नाही.

६) स्वत:ला स्पेशल समजणे
मला कोणताही आजार होणार नाही कारण मी जन्मजातच आरोग्यपुर्ण आहे. किंवा मी गाडी व्यवस्थीत चालवितो म्हणुन मला अपघात होणारच होणारच नाही असा चूकीचा गैरसमज लोकांच्यात असतो. त्यामूळे हे लोक आरोग्यविमा आणि अपघातविम्यापासून दूर राहतात.

७) दूरदृष्टीचा अभाव

लोक लांबचा विचार करत नाहीत आणि कांही करायला तयार होत नाहीत. वाढत्या महागाईत २०-२५ वर्षांनंतर एका लग्नाचा खर्च किंवा मुलांच्या शिक्षणाचा खर्च किती असेल? घरखर्च किती येईल याचा अंदाज ते बांधू शकत नाहीत. आज जर घरखर्च महिणा १०,०००/- रुपये असेल तर २५-३० वर्षांनी तो दरमाही लाखाच्या घरात असेल. आज ३ लाखात होणारे लग्न २० वर्षानी १५ - २० लाखातही होणार नाही याची जाणीव फ़ार कमी लोकाना आहे.

८) खुपसारी देणेदारी असणे

लोकांनी "सुलभ मासिक हप्त्यात " या ब्रिदवाक्याखाली खुपसा-या गोष्टी घेउन ठेवल्यात उदा. डब्बल डोअर फ़्रिज, मोठे टिव्ही, अलिशानफ़र्निचर पासुन २ बीएचके - ३ बीएचके फ़्लॅटपर्यंत आणि आता त्याच्या हप्त्यांच्या जंजाळातून लहान सहान गोष्टीसुध्दा करताना नाकी नऊ येत आहे. छोट्यामोठ्या सहली, आईवडिलांना स्वत:सोबत ठेवणेही आता अवघड होऊन बसले आहे. कारण फ़क्त "सुलभ मासिक हप्त्यात " मिळणा-या गोष्टी.

आणि वरच्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे - अर्थिक साक्षरतेचा अभाव.


jagoinvestor या ब्लॉगवरुन साभार