Sunday, 27 December 2015

मनिषच्या आयुष्यातील दोन प्रसंग

मनिषच्या आयुष्यातील दोन प्रसंग
1) 
मनिष माझ्याकडे घाईघाईने येतो, “मला माझे पैसे परत पाहिजेत !!”
(मनिषने ३-३.५ वर्षापुर्वी माझ्याकडे ५ लाख रुपये गुंतविले होते.
मी: “ओके. आजच्या व्हॅल्युएशनप्रमाने ८.५० लाख रुपये मिळतील. आज सही करुन जा ३-४ दिवसात पैसे तुझ्या खात्यावर जमा होतील. पण खुप इमरजन्सी असेल तरच काढ. कारण आपण पैसे गुंतवताना Long Term साठी गुंतविले आहेत."
मनिष: पण तुम्ही गेल्या महिण्यात म्हणाला होता की व्हॅल्युएशन ९ लाखापेक्षा जास्त आहे म्हणुन ?
मी: होय. पण बघतोस ना तेव्हापासुन शेअर मार्केट डाउन आहे. तरिहि हे पैसे १५-१६% वार्षिक व्याजासह मिळाल्यासारखे आहेत आणि टॅक्स फ़्री आहेत. तुझी गरजही भागेल.
मनिष: ओह्ह . . .मग राहुदेत आता. कारण मला आत्ता अशी कमी झालेली रक्कम नको तसेही मी Long Term साठीच गुंतविले आहेत. मला माहित आहे शेअर मार्केट नेहमी खाली जात नाही पुन्हा वरती जाइलच.

(मलाही समाधान वाटले. हा लॉंग टर्मचा फ़ॉर्म्युला छानच आहे.)

2)
काही महिण्यानी मनीषने ठरविले की आपल्या मनीबॅक/एन्डोवमेन्ट पॉलिसी मोडुन त्यातलाच पैसा काढुन आपली गरज भागवावी. त्याने इकडुन तिकडुन फ़ोनाफ़ोनी करुन आपला एजन्टचा नंबर शोधुन काढला. (कारण तो एजंट विनोद मनीषच्या पहिल्या नोकरीच्या ठिकाणी भेटला होता आणि पुन्हा कधी गाठभेटच नव्हती. तो सापडला हे पण काय कमी आहे?)
मनिष: हाय मि. विनोद मला ओळखले का? मी मनिष !! अरे भाऊ कुठे आहे आजकाल?
मि. विनोद: (ओळखले ना. कसे विसरेन तुझी १०००वी पॉलिसी केल्यामुळेच तर मला परदेशी ट्रिप मिळाली होती ) ओळखले सर्र, तुम्हाला कसे विसरेन ?
मनिष: मि.विनोद माझ्यासाठी एक काम कराल काय? मला खुप अडचण आहे आणि मला माझ्या पॉलिसी सर-अंडर करुन पैसे काढायचे आहेत.
मि. विनोद: का नाही सर्र !! आम्ही त्यासाठीच तर आहोत. नक्की तुम्ही तुमच्या पॉलिसी घेउन या माझ्या ऑफ़िसला आपण सर-अन्डर करुन टाकू (सुरवातीची जास्त कमीशनची वर्षे तर संपलीच आहेत, माझे कमीशन तर बाहेर पडलेच आहे हा हा हा)
मनीष: वाव. .. तुम्ही एजंट लोक भारीच आहात . . तर मग मला किती रुपये परत भेटतील ?
मि. विनोद: ६० हजार सर्र
मनीष: मी व्याजाचे म्हणत नाही मि. विनोद, सगळे मिळून किती मिळणार विचारतोय
मि. विनोद: ( स्स बावळट कुठला) सगळे मिळुन ६० हजार, सर्र. तुम्हाला माहीतच असेल मॅच्युरिटीच्या अगोदर सरं-अंडर केल्यास किती व्हॅल्यू होते, बरोबर ना सर्र?
मनीष: पण मी तर १.५० लाख रुपये भरल्यात गेल्या ५ वर्षात, तुम्ही असे काय बोलताय?
मि. विनोद: सर्र तुम्ही सही केलेल्या डॉक्युमेन्टमधेच सगळे लिहिलेले होते. आम्ही कंपनीच्या नियमानेच सगळे कांही करतो. सर्व कारभार आमच्या कंपनीच्या पोलिसीप्रमाणेच चालतो.
 
सन्नाटा sss

आपण आशा करुयात की मनीषने आपल्या पनौतीचा स्विकार करुन यातून कांहीतरी मार्ग काढलाच असेल. तुम्ही अशा प्रसंगाला कसे सामोरे जाल?

(मनीष चौहान आणि नंदीश देसाई यांच्या सुप्रसिध्द "जागो इन्व्हेस्टर" या ब्लॉगवरुन साभार. )

No comments:

Post a Comment